रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचालित शिरगाव येथील बाया कर्वे कौशल्य विकास संस्थेत महिला सक्षमीकरणासाठी दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. टेलरिंग व ब्युटीकल्चर क्षेत्रातील सीसी इन ड्रेस मेकिंग आणि सीसी इन प्रोफेशनल कोर्स इन ब्युटीकल्चर अँड हेअर ड्रेसिंग असे हे दोन अभ्यासक्रम आहेत.
महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळातर्फे हे दोन्ही अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहेत. सीसी. इन ड्रेस मेकिंग अभ्यासक्रमाचा कालावधी ६ महिने असून प्रवेश संख्या ३० आहे. हा अभ्यासक्रम अर्धवेळ आहे. सी.सी. इन प्रोफेशनल कोर्स इन ब्युटी कल्चर अँड हेअर ड्रेसिंग (अर्धवेळ) याचा कालावधी ६ महिने असून प्रवेश पात्रता दहावी पास असून प्रवेश संख्या ३० आहे.
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र राज्य शासनाच्या मंडळाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळेल. अभ्यासक्रमासाठी शुल्क माफक आहे. महिला, मुलींसाठी सुरक्षित व सोयींनीयुक्त स्वतंत्र शैक्षणिक संकुल परिसर आहे. दररोज ४ तास प्रशिक्षण अनुभवी प्रशिक्षकांकडून दिले जाईल. अद्ययावत यंत्र सामुग्रीसह भरपूर प्रात्यक्षिक सराव करून घेतला जाईल. महिला, गृहिणी, महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी सोयीस्कर अशा वेळा ठेवल्या आहेत. बाहेरगावच्या विद्यार्थिनींसाठी वसतिगृह व खाणावळ सुविधा उपलब्ध आहे. व्यवसाय मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी बाया कर्वे कौशल्य विकास संस्था, कडवाडकर संकुल, साखरतर रोड, शिरगांव रत्नागिरी येथे संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:11 PM 03/Feb/2025














