रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील विद्युत मीटर बदलण्याच्या प्रक्रियेत अदानी समूहाचा सहभाग असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीव्र विरोध दर्शविला आहे. ही मीटर जोडणी तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी आणि महावितरण कंपनीला निवेदन देण्यात आले.
जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी पत्रकार परिषदेत या मीटर जोडणी थांबवली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला.
शिवसेनेच्या वतीने नवनियुक्त तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, शहर संघटक प्रसाद सावंत यांच्यासह तालुका, शहर कार्यकारिणी पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते. संजय पुनसकर यांनी स्पष्ट केले की स्मार्ट व प्रीपेड मीटर जोडून गरीब जनतेला वेठीस धरू नये आणि अदानी समूहासाठी देण्यात आलेले विभागीय कार्यालय प्रथमतः खाली करण्यात यावे. महावितरण कंपनीचे मीटर आहेत ते तसेच ठेवण्यात यावेत, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:44 04-02-2025














