‘बीपीसीएल’ मध्ये १५४ नॉन-मॅनेजमेंट पदांसाठी भरती; १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत

मुंबई आणि कोची रिफायनरीमध्ये भरती प्रक्रिया; डिप्लोमाधारकांसाठी सुवर्णसंधी

भारत सरकारचा ‘महारत्न’ दर्जा असलेला सार्वजनिक उपक्रम भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) अंतर्गत मुंबई रिफायनरी आणि कोची रिफायनरीमध्ये नॉन-मॅनेजमेंट प्रवर्गातील एकूण १५४ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.

आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

infigo

पदांचे नाव आणि एकूण जागांचा तपशील

या भरती प्रक्रियेद्वारे खालील विविध पदांवर भरती केली जाणार आहे:

  • (A) प्रोसेस टेक्निशियन (केमिकल) – मुंबई रिफायनरी: एकूण ६० पदे (अजा – ८, अज – १४, इमाव – २, ईडब्ल्यूएस – ६, खुला – ३०)
  • (B) प्रोसेस ऑपरेटर / ऑपरेटर (केमिकल) – कोची रिफायनरी: एकूण ६४ पदे (अजा – ६, अज – २, इमाव – १७, ईडब्ल्यूएस – ६, खुला – ३३)
  • (C) टेक्निशियन ऑपरेटर (मेकॅनिकल) – कोची रिफायनरी: एकूण १३ पदे (अजा – २, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ७)
  • (D) टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – कोची रिफायनरी: एकूण १७ पदे (अजा – २, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ८)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  • पद क्र. A व B: केमिकल इंजिनीअरिंग / केमिकल टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा (किमान ६०% गुण; अजा/अज/दिव्यांग उमेदवारांसाठी ५०% गुण).
  • पद क्र. C: मेकॅनिकल इंजिनीअरिंग मध्ये डिप्लोमा (किमान ६०% गुण; अजा/अज/दिव्यांग उमेदवारांसाठी ५०% गुण).
  • पद क्र. D: इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम / इलेक्ट्रिकल (इंडस्ट्रियल कंट्रोल) इंजिनीअरिंग मध्ये डिप्लोमा (किमान ६०% गुण; अजा/अज/दिव्यांग उमेदवारांसाठी ५०% गुण).
  • कामाचा अनुभव (१ जुलै २०२६ रोजी): सर्व पदांसाठी संबंधित क्षेत्रातील किमान १ वर्षाचा कामाचा अनुभव किंवा रिफायनिंग / पेट्रोलियम / पॉवर / ल्युब / पेट्रोकेमिकल / फर्टिलायझर इंडस्ट्रीमधील १ वर्षाचे ‘अॅप्रेंटिसशिप अॅक्ट १९६१’ अंतर्गत ट्रेनिंग असणे आवश्यक आहे.
  • इतर अटी: फक्त नियमित डिप्लोमाधारकच अर्ज करू शकतात (समकक्ष, दूरस्थ शिक्षण किंवा अर्धवेळ डिप्लोमाधारक पात्र नाहीत). १२ वी सायन्स किंवा आयटीआय नंतर थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतलेले डिप्लोमाधारकही पात्र राहतील.

वयोमर्यादा (१ जुलै २०२६ रोजी)

  • वयोमर्यादा: १८ ते २५ वर्षे.
  • वयोमर्यादेत सूट: इमाव (OBC) – ३ वर्षे, अजा/अज (SC/ST) – ५ वर्षे, आणि दिव्यांग उमेदवारांसाठी १० ते १५ वर्षे सवलत लागू राहील.

वेतन श्रेणी

  • पे-स्केल: रु. २६,५०० ते रु. ३४,०००/- (मूळ वेतन रु. २६,५००/- याशिवाय आयडीए आणि इतर शासकीय भत्ते दिले जातील).

निवड पद्धती आणि परीक्षा शुल्क

  • निवड प्रक्रिया: १. १०० गुणांची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT – वेळ १२० मिनिटे; डोमेन नॉलेज ६० गुण आणि जनरल ॲप्टिट्यूड ४० गुण). २. स्किल / प्रोफिशियन्सी टेस्ट (फक्त पात्रता स्वरूपाची). ३. प्री-एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झामिनेशन.
  • परीक्षेचा महिना: कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सप्टेंबर २०२६ मध्ये आयोजित केली जाईल.
  • अर्ज शुल्क: रु. ५००/- + १८% जीएसटी रु. ९०/- (एकूण रु. ५९०/-).

महत्त्वाच्या तारखा व संकेतस्थळ

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ ऑगस्ट २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
  • अधिकृत संकेतस्थळ: www.bharatpetroleum.com > Careers
  • ई-मेल आयडी (शंकासमाधानासाठी): zrefrect@bharatpetroleum.in