गुहागर : शृंगारतळी बाजारपेठेवर सीसीटीव्हीचा वॉच

गुहागर : गुहागर तालुक्यातील करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेमध्ये पाटपन्हाळे ग्रामपंचायत वतीने सीसीटीव्ही लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता शृंगारतळी बाजारपेठेवर सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे.

शृंगारतळी बाजारपेठेमध्ये गुहागर तालुका तसेच चिपळूण तालुक्यातील अनेक गावातील ग्राहक या बाजारपेठ मध्ये खरेदीसाठी येत असतात. तसेच याच बाजारपेठमधून गुहागर येथील श्री व्याडेश्वर मंदिर, श्री दुर्गा देवी मंदिर तसेच हेदवी येथील श्री दशभुज गणेश मंदिर, वेळणेश्वर येथील श्री वेळणेश्वर मंदिर व अन्य मंदिरे त्याचप्रमाणे गुहागर येथील स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. त्याचप्रमाणे धोपावे व तवसाळ फेरीबोटीसाठी या शृंगारतळी बाजारपेठेमधून जावे लागते. त्यामुळे या ठिकाणी सतत रहदारी सुरू असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय म्हणून पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्यावतीने बाजारपेठेतील मुख्य ठिकाणी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी दोन सीसीटीव्ही लावण्यात आले असून अजून दोन सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच असीम साल्हे यांनी दिली. एखादा अनुचित प्रकार बाजारपेठेमध्ये घडल्यास तो प्रकार सीसीटीव्हीत कैद होऊ शकतो. त्यामुळे तपास त्वरित होऊ शकतो. बाजारपेठेमध्ये सीसीटीव्ही बसविल्याने पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच असीम साल्हे त्याचप्रमाणे सर्व सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांचे सर्व वाहन चालक, व्यापारी व ग्राहक यांनी आभार मानले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 06/Feb/2025