रत्नागिरी : महाराष्ट्र मोटरवाहन विभागामार्फत दिशा राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव बालेवाडी (पुणे) येथे केले. यामध्ये रत्नागिरीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील लिपिक राधा बसणकर यांनी धावण्याच्या शर्यतीत ४x१०० रिलेमध्ये सुवर्णपदक, १०० मीटर धावण्यात आणि ५ किमी धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. याबद्दल त्यांचे
रत्नागिरीत अभिनंदन करण्यात येत आहे.
या क्रीडा स्पर्धा चार दिवस सुरू होत्या. स्पर्धेचे दुसरे वर्ष होते. यामध्य २५ क्रीडाप्रकारांत पुरुष व महिलांच्या ४५ वर्षांखालील व ४५ वर्षांवरील अशा वयोगटात घेण्यात आले. स्पर्धेमध्ये जवळपास ६०० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धासाठी परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते हार्दिक जोशी, भूषण कडू, शाहीर नंदेश उमप, परिवहन विभागातील सर्व अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी आदी उपस्थित होते. रत्नागिरीत गेल्या वर्षापासून कोकण कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात झाली. यंदा दुसऱ्या वर्षीही या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी राधा बसणकर मोटिव्हेटर होत्या. त्यांच्या माध्यमातून अनेक महिलाही या स्पर्धेत सहभागी झाल्या. धावनगरी रत्नागिरी करण्याकरिता त्या योगदान देत असल्याबद्दल सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
शाळा महाविद्यालयात असताना खो-खो, मैदानी स्पर्धा यामध्ये सहभागी होत होते; मात्र नंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे खेळाची आवड मागे पडली. कोकण कोस्टल मॅरेथनच्या पहिल्या पर्वामुळे ही संधी पुन्हा उपलब्ध झाली. प्रॅक्टिस रनच्या माध्यमातून सराव चालू राहिला. कोकण कोस्टलचे प्रसाद देवस्थळी, डॉ. नितीन सनगर, मानसी मराठे, अविनाश फडके, तसेच इतर ग्रुप मेंबर्स यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे व कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे आरटीओच्या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू शर्यतीत असतानासुद्धा पदक मिळवता आले. – राधा बसणकर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 07/Feb/2025














