दापोली : दापोली आगाराला नव्याने उपलब्ध झालेल्या बीएस ६ प्रणालीच्या एसटी बस लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडल्या जात असून, त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याची माहिती येथील एस.टी. आगारातून देण्यात आली. यामध्ये सकाळी ६.३० वाजता दापोली-नाशिक-धुळे व पहाटे ५.१५ वाजता धुळे नाशिक-दापोली या मार्गावर दोन बस, सकाळी ६ वाजता दापोली-मुंबई, ६.३० दापोली जलद रत्नागिरी, सायंकाळी ४ वाजता दापोली-चिपळूण, १० वाजता दापोली-मंडणगड-भाईदर, ९.३० वाजता दापोली-खेड-भाईदर, सकाळी ९.३० वाजता दाभोळ-मुंबई, रात्री ९.४५ दाभोळ-मुंबई अशा मार्गावर ८ गाड्या धावत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 08/Feb/2025












