चिपळूण : भाजप पक्षाच्या सदस्यता मोहिमेला अधिक गती देण्याच्यादृष्टीने प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गावागावांत आणि घराघरांत गेले पाहिजे. जनतेशी संवाद साधून त्यांना भाजप परिवारात सामील करून घ्यावे, असे आवाहन पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले.
चिपळूण, गुहागर आणि दापोली विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संघटनपर्व आढावा बैठक गुरुवारी चिपळूण येथे झाली. बैठकीत आमदार रवींद्र चव्हाण यांनी विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या सदस्यता नोंदणीचा आढावा घेतला.
सदस्यता मोहिमेला अधिक गती देण्याची गरज असल्याचे सांगितले. या वेळी सदस्यता मोहिमेचे निर्धारित लक्ष्य पूर्ण केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, कोकण संघटन मंत्री शैलेंद्र दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यकारी अध्यक्ष झाल्यावर आमदार चव्हाण प्रथमच चिपळूण दौऱ्यांवर आल होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 10/Feb/2025














