कोकण रेल्वे तर्फे २३, २४ फेब्रुवारीला सावंतवाडी-एलटीटी स्पेशल

खेड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी भराडी देवी जत्रेच्या पार्श्वभूमीवर २१ व २२ फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वे प्रशासनाने दोन स्पेशलच्या फेऱ्या जाहीर केलेल्या असतानाच भाविकांच्या परतीसाठीही सावंतवाडी- एलटीटी स्पेशल धावणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी जाहीर केले.

या स्पेशलचे आरक्षण ९ फेब्रुवारी रोजी खुले होणार आहे.

०११३४ / ०११३३ क्रमांकाची सावंतवाडी-एलटीटी स्पेशल २३ फेब्रुवारी रोजी धावेल. सावंतवाडी येथून सायंकाळी ६ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता एलटीटीला पोहचेल. परतीच्या प्रवासात २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता एलटीटी सुटून त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता सावंतवाडी येथे पोहचेल.

२० एलएचबी डब्यांची स्पेशल कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे स्थानकात थांबे आहेत.

Shanti 3

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:34 11-02-2025