खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील लवेलनजीक झालेल्या अपघातात वृद्ध कामगाराच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पंडित नामक चालकावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल रामचंद्र खळे (वय ७५, लवेल-खळेवाडी) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ते लवेल येथील एच. पी. पेट्रोलयासमोरील बाजूस साफसफाईचे काम करत असताना डिझेल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर आलेल्या मिक्सर वाहनाने (एम.एच.१२/एस.एक्स. ६७७८) धडक देत गंभीर दुखापत केली. या बाबत महेश कृष्णा खोडदेकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 12/Feb/2025














