साडवली : निसर्गाकडे पाहण्याची संवेदनशील दृष्टी आणि सामान्य माणसातील असामान्यत्व शोधण्यासाठी लागणाऱ्या विलक्षण दृष्टीमुळे अनेक रहस्य नदीष्ट कादंबरीमुळे उलगडता आली. सगुणाला जाणून घेण्यासाठी, तृतीयपंथीयांचे जीवन समजून घेण्यासाठी प्रथम माणूस म्हणून त्यांना समजून घेणे आवश्यक होते. नदी वाहती राहिली पाहिजे. यातून मानवी संस्कृती टिकेल. त्यासाठी माणसाला निसर्गाची काळजी घेण्याची विवेकबुद्धी दे, असे प्रतिपादन लेखक प्रा. मनोज बोरगावकर यांनी केले.
देवरूख महाविद्यालयात आयोजित ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विद्यार्थ्यांनी लेखक प्रा. बोरगावकर यांना विविध प्रश्न विचारले. त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. वर्षा फाटक यांनी बोरगावकर यांचा परिचय करून देऊन मुलाखत घेतली. या वेळी लेखकाने कादंबरीचा प्रवास उलगडून दाखवताना
शहरीकरणामुळे मानवाकडून निसर्गाच्या होणाऱ्या हानीकडे अत्यंत तळमळीने लक्ष वेधले असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांनी लेखक बोरगावकर यांच्याशी संवाद साधताना आपल्या मनातील प्रश्न विचारले. मुलाखतीनंतर आभार प्रा. अजित जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, मदनजी मोडक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि गावातील नागरिक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 15/Feb/2025














