चिपळूण : राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट व गोवळकोट ग्रामस्थ यांच्यावतीने शहरातील गोवळकोट येथील ऐतिहासिक दुर्ग गोविंदगडावर बुधवारी (ता. १९) शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचे हे ११ वे वर्ष आहे. यानिमित्त बुधवारी सकाळी ७ वाजता ऐतिहासिक दुर्ग गोविंदगड पूजन, गडदेवता श्री देवी रेडजाई मातेचे पूजन व ध्वजपूजन, सकाळी ९.३० वाजता शिवप्रतिमेचे पूजन आणि आरती, १० वाजल्यापासून राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या संग्रहातील ऐतिहासिक व पुरातन वस्तूंचे प्रदर्शन, सायंकाळी ४ वाजता मान्यवरांचे स्वागत आणि विविध ऐतिहासिक कार्यक्रम होतील. ६.३० वाजता काडवली येधाल रोहित महाराज आग्रे यांचे शिवचरित्रपर कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमांना शिवप्रेमी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजे सामाजिक प्रतिष्ठानमार्फत केले आहे.
आपलाही सहभाग हवा
‘चला जपूया आपल्या पूर्वजांची धारातीर्थ’, असा वसा घेऊन राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोट या संस्थेच्या माध्यमातून गोविंदगड संवर्धन कार्य हा नवा उपक्रम सुरू केला आहे. आता या कार्यात सर्वांना सहभागी होता येणार आहे. यासाठी शिवप्रेमींनी प्रत्यक्ष मोहिमेत सहभागी होऊन श्रमदान करावे. गडसंवर्धन कार्यासाठी लागणारे साहित्य द्यावे अथवा गडसंवर्धन निधी स्वरूपात आपण आर्थिक मदत करावी, असे आवाहनही करण्यात येत आहे. यासाठी प्रथमेश शिंदे, सौरभ टाकळे यांच्याशी संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 18/Feb/2025














