चिपळूण : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून ९ मार्च रोजी फक्त महिलांसाठी जिल्हास्तरीय अभिनय स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे ३० ते ५० आणि ५० वर्षांच्या पुढील खुला गट अशा दोन गटात घेण्यात येणार आहेत. स्पर्धकाने https://forms.gle/sjSY9 mLwUjR1RzCP9 हा गुगल फॉर्म भरून आपली नाव नोंदणी करायची आहे.
नावनोंदणीची अंतिम तारीख २ मार्च आहे. दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांक १ हजार ५०० रुपये आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक १ हजार रुपये आणि प्रमाणपत्र, तृतीय ७०० रुपये, तसेच उत्तेजनार्थ ५०० रुपये आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अ. भा. नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या प्रमुख कार्यवाह डॉ. मीनल ओक आणि स्पर्धा प्रमुख आदिती देशपांडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अपर्णा नातू यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 18/Feb/2025














