माखजन : आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा असून विद्यार्थ्यांनी भविष्यातील योग्य संधीचा शोध घेऊन आपले करिअर निवडल्यास भावी वाटचाल सुखकर होईल असा आशावाद करजुवे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य शशिकांत नलावडे यांनी व्यक्त केले ते करजुवे, तालुका संगमेश्वर येथील माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या व वार्षिक पारितोषिक व सदिच्छा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी संस्था सचिव सूर्यकांत देवस्थळी संचालक व माजी सभापती सुभाष नलावडे, संचालक शामसुंदर माने, संचालिका प्रिया नलावडे, मुख्याध्यापक अशोक कोळेकर, मधुसूदन देवस्थळी, आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होत.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व इशस्त्वनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. सुरवातीला वार्षिक क्रीडा महोत्सव, चित्रकला गायन वादन पुरस्कार, आदर्श विद्यार्थी पुरस्कार, आदर्श वाचन पुरस्कार, उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार इंटरमिजिएट एलिमेंटरी आधी सह विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या विविध चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते तसेच शालेय हस्तपुस्तिका ‘अरुणोदय याचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले तसेच मागील वर्षी इयत्ता दहावी मध्ये प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सन्मानित करण्यात आले. सदिच्छा समारंभात मानसी भायजे सानिका शिकवण, निधी शिकवण रिया पडे आदींनी मनोगत व्यक्त केलीत. तसेच सुभाष नलावडे, सूर्यकांत देवस्थळी, रामराव बनसोडे, मुख्याध्यापक अशोक कुवळेकर आदींनी मनोगता मधून दहावीच्या विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सुनील केसरकर विठोबा धावडे सुरज माने सचिदानंद शिर्के, संतोष कासारे, किशोर धामापूरकर विठ्ठल नलावडे सुमित नलावडे आशिष कांबळे सुरेश कुंभार आदी अध्यापक विध्यार्थी पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग खैर यांनी केले आभार प्रमोद स्वामी यांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 18/Feb/2025














