रत्नागिरी : कांदळवन प्रशिक्षणावर साडेसात लाख रुपये खर्च ?

रत्नागिरी : कांदळवन व वन विभागाकडून रत्नागिरीतील एका आलिशान हॉटेलमध्ये कांदळवन प्रशिक्षण कार्यशाळा झाली. चार तास चाललेल्या कार्यशाळेसाठी सुमारे साडेसात लाख रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये उपस्थितांना कांदळवन संरक्षण, समुद्री प्राण्यांची सुटका व संरक्षण याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. दिलेल्या प्रशिक्षणाचा जिल्ह्याच्यादृष्टीने काय फायदा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रत्नागिरी शहराजवळ राष्ट्रीय महामार्गावरील एका आलिशान पॅलेसमध्ये ही कार्यशाळा झाली. कांदळवन विभाग आणि वन विभागाकडून याचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यासाठी सुमारे १० लाखांची आर्थिक तरतूद होती. या कार्यशाळेसाठी पोलिस, कस्टम, कोस्टगार्ड, मत्स्यविभाग, मच्छीमार सोसायटी, सुरक्षादलाच्या प्रतिनिधींना निमंत्रण दिले होते. सुमारे १३० तोफ या कार्यशाळेला उपस्थित हो, कांदळवनाचे संरक्षण कसे करावे, त्याचे फायदे-तोटे काय वादीचायत याची माहिती देण्यात आली, समुद्र प्राणी वाळ्यात किया किनाऱ्यावर अडकले तर त्यांची सुटषर कली करावी, त्यांना किनान्यवरून रेस्क्यू कसे कराये याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी डॉल्फिन माशाची प्रतिकृती ठेवण्यात अवली होती, मच्छीमारांच्या जाळ्यात मासा अडकला तर काय करायचे,

कांदळवन आणि वन विभागामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम झाला. समुद्रात प्राणी अडकला, तर त्याची सुटका कशी करावी, नुकसान झाले, ता त्याची भरपाई कशी मिळवावी, याचे प्रशिक्षण दिले. तसेच किनाऱ्यावर अडकलेल्या डॉल्फिन माशाला कसे रेस्क्यू करावे, याचे प्रशिक्षणही देण्यात आहे. चार तासांचा हा कार्यक्रम होता. त्यावर साधारण साडेसात लाख रुपये खर्च झाले आहेत.
किरण ठाकूर, कांदळवन अधिकारी, रत्नागिरी

यावर प्रतिक्षण दिले, समुद्री किनाऱ्यावर मासा अडकला तरी रेस्क्यू ऑपरेशन कसे करायचे याची माहिती दिली परंतु या चार तासांसाठी प्रशिक्षणासाठी सुमारे आठ लाख रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. वास्तविक ही कार्यशाळा शासकीय विश्रामगृहसह रत्नागिरी शहरात उपलब्ध शासकीय कार्यालयाशील विविध हॉलमध्ये हा कार्यक्रम घेता आला असता. त्यातून शासनाच्या पैशाची बचतही झाली असती; परंतु अलिशान हॉटेल निवडल्यामुळे प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. चार तासाच्या कार्यशाळेसाठी साडेसात लाख रुपये खर्च केल्यामुळे या प्रशिक्षणाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:54 PM 18/Feb/2025