रत्नागिरी : महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या खेळाडूंनी पटकवली राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये चॅम्पियन ट्रॉफी !

रत्नागिरी : दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी चॅम्पियन्स स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,येरवडा, पुणे येथे हेसप्रो स्पोर्ट्स फौंडेशन तर्फे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा घेण्यात आली होती.सदर स्पर्धेमध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या 6 खेळाडूंनी सहभाग घेतला होता व त्या मध्ये
करण महेश मिलके (वयोगट 20-35) 8 सुवर्ण पदक,
तनया महेश मिलके (वयोगट 20-35)11 सुवर्ण पदक,
आयुष अजय काळे ( वयोगट 16 वर्षाखालील )
8 सुवर्ण पदक, निधी शरद भिडे ( 14 वर्षाखालील ) 8 सुवर्ण पदक, कार्तिकी प्रकाश भुरवणे (14 वर्षाखालील ) 7 रौप्य पदक व 1 सुवर्ण पदक अशी 35 सुवर्ण पदक व 7 रौप्य अशी 42 पदकांची कमाई केली तसेच रुद्र परेश सरफरे ( 10 वर्षाखालील) उत्कृष्ट कामगिरी करत महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये जनरल चॅम्पियनशिप पटकवली असून रत्नागिरी जिल्यातील इतिहासातील जलतरणातील ही पहिलीच ट्रॉफी आहे.तसेच 14 वर्षाखालील गटातील खेळाडूंना best swimmer of tournament साठी सायकल बक्षीस ठेवण्यात आली होती त्यामध्ये निधी भिडे हिने हे बक्षीस पटकावले.

त्यानिमित्ताने दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे शिवसेना शहर प्रमुख ( शिंदे गट ) श्री. बिपीन बंदरकर, रत्नागिरी खबरदार चे संपादक व महाराष्ट्र मराठी भाषा साहित्य संमेलन चे उपाध्यक्ष श्री. हेमंत वणजू तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बाजीराव पवार यांनी शासकीय जलतरण तलाव, साळवी स्टॉप रत्नागिरी येथे सदर स्पर्धाकांचा व राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. महेश मिलके सर यांचा सत्कार करण्यात आला.

श्री.हेमंत वणजू यांनी अध्यक्षीय भाषण करताना गेल्या 5 वर्षात महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या खेळाडूंनी रत्नागिरी चे नाव राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावल्यामुळे आम्हाला याचा रत्नागिरीकर म्हणून सार्थ अभिमान वाटत आहे, असे मत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या व प्रमुख पाहुणे श्री. बिपीन बंदरकर यांनी आपल्या मनोगतमध्ये बोलताना गेल्या 5 वर्षात प्रशिक्षक महेश मिलके यांनी स्वतःमध्ये बदल करून अनेक अडी अडचणींवर मात करून महेश मिलके स्विमिंग ग्रुप ने केलेल्या कामगिरी बद्दल अभिनंदन केले. तसेच कोणत्याही प्रकारची अडचण आली तर रत्नागिरी चे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या कडून मदत उपलब्ध करून देऊ व महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या पाठीशी नेहेमीच खंबीर पणे उभे राहू, असे आश्वासन दिले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच पालकांच्या वतीने प्राध्यापक श्री. सुतवणे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महेश मिलके स्विमिंग ग्रुप चे प्रशिक्षक श्री. महेश मिलके सर, त्यांच्या पत्नी सौ. गौरी महेश मिलके, दोन मुले करण व तनया यांचे विशेष आभार मानत असे प्रशिक्षण व आपुलकी जगात कुठेही मिळणार नाही असे मत व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 19-02-2025