चिपळूण : कचरा जाळताना वृद्धा भाजली

चिपळूण : तालुक्यातील येगाव येथे परिसरातील कचरा गोळा करुन जाळत असताना भाजलेल्या वृध्देला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना सोमवार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रगती पर्शुराम महाडिक (६०, रा येगाव, चिपळूण) असे भाजलेल्या वृध्देचे नाव आहे. सोमवारी सकाळी ती घराच्या परिसरातील पाला-पाचोळा गोळा करुन जाळत शेकोटी घेत होती. शेकोटी घेत असताना तिच्या अंगावरील गाउनने अचानकपणे पेट घेतला. या घटनेत आई भाजल्याची बाब तिच्या मुलीच्या लक्षात येता मुलीने तिला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र कामथे येथे दाखल केले होते. त्या नंतर अधिक उपचारांसाठी मंगळवारी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 19/Feb/2025