लांजा उड्डाणपूल डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्णत्वास

लांजा : लांजा शहरातील सेवा रस्ता एप्रिल महिन्यात पूर्ण होणार असून शहरातील उड्डाणपुलाचे काम डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण होईल. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीस खुला होईल, असे महामार्गाचे उपअभियंता कुलकर्णी यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम बरेच वर्ष सुरू आहे. शहरातील उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. रस्ता खोदाईमुळे शहरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पक्का सर्व्हिस रस्ता नसल्यामुळे खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.

कामाला सुरवात करण्याआधी पक्का सेवा रस्ता करणे आवश्यक असताना कोणतीही कार्यवाही केलेली नाही. वारंवार जनतेतून पक्का सर्व्हिस रस्त्याची मागणी करूनही आजतागायत सेवा रस्ता केलेला नाही. तसेच याच सर्व्हिस रस्त्यालगत गटार असल्याने नगरपंचायतीकडून नळपाणीचे पाईप जोडण्याचे काम होत असल्यामुळे नेमका काय प्रकार आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या संदर्भात उपअभियंता कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शहरातील उड्डाणपुलाचे काम डिसेंबर महिन्यात पूर्ण होऊन वाहतुकीस खुला होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 19/Feb/2025