राजापूर : धूतपापेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम

राजापूर : तालुक्यातील असंख्य शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ऐतिहासिक भवानीशंकर श्री धूतपापेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. २२ फेब्रुवारी ते शुक्रवार दि. २८ फेब्रुवारीपर्यंत पारंपरिक वाद्य, नित्यपूजा, श्रींवर रुद्राभिषेक, श्रींचा शयनकाल, गायन, कीर्तन, भोवती, नित्य आरती अशा नित्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दि. २६ फेब्रुवारी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी नित्य पूजा, श्रींवर रुद्राभिषेक, विविध मंडळांचे भजनाचे कार्यक्रम, शिवस्वरांजली भक्तिभाव गीतांचा सुमधुर कार्यक्रम, बुवा श्री गजानन मनोहर पवार यांचे संगीत भजन, श्रींची महापूजा, महानैवेद्य, मंत्र पुष्पांजली, भोवती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. १ मार्च २०२५ रोजी दुपारी १ नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २८ फेब्रुवारी रोजी आरती झाल्यानंतर श्री बजरंग नमन मंडळ खांबल वाडी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 19/Feb/2025