रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या सांगलीतील तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वा. सुमारास घडली.
सचिन बबन कापसे (38, रा. जत, सांगली) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत खबर देणारे हे आपल्या कुटुंबासह खाजगी गाडीवर सचिन कापसे याला चालक म्हण्णून गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते.
गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वा. सुमारास तेथील एका हॉटेलमध्ये जेवण करुन सर्वजण गाडीजवळ येत असताना चालक सचिन कापसे चक्कर येउन पडला. खबर देणार यांनी तातडीने त्याला मालगुंड येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथिल वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मध्यरात्री 2.25 वा. सचिनला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 19/Feb/2025














