Sindhudurg American Women in Forest : बनाव करणारी विदेशी महिला मायदेशी रवाना

रत्नागिरी :Sindhudurg American Women in Forest जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात सापडलेल्या एका विदेशी महिलेन एकच खळबळ उडवून दिली होती. हि विदेशी महिला जंगलात साखळीन झाडाला बांधलेली सापडली होती. आपल्या पतीने इंजेक्शन देऊन झाडाला बांधून ठेवलं असं या महिलेने पोलिसांना सांगितले होते.

मात्र तपासांती वेगळीच माहिती समोर आली होती. तिचे मानसिक संतुलन बिघडल्याने या महिलेने स्वतःहून जंगलात बांधून घेतलं होतं, पोलिसांची दिशाभूल करीत बनाव केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर या महिलेला उपचारांसाठी रत्नागिरी शासकीय मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तिच्यावर उपचार करून तिला मायदेशी रवाना करण्यात आलंय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:38 03-10-2024