चिपळूण : आगवे येथील लोटाची बाव या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी गवा रेडा विहिरीत पडला असलेबाबात पोलिस पाटील आगवे यांनी भ्रमणध्वनी वरून आज दिनांक १९.०२.२०२५ रोजी कळविले त्यानुषंगाने सदरचे घटनेची जागेवर जाऊन पाहणी करून वरिष्ठांचे मार्गदर्शनात जेसीबी च्या साहाय्याने विहिरीचे एका बाजूने मार्ग करून विहिरीचे विहिरीचे बाहेर सुखरूप काढले व नैसर्गिक अधिवासात मुक्त केले बचाव कार्य प्रसंगी वनपाल सावर्डे श्री उमेश आखाडे व वनरक्षक नांदगाव श्री अनंत मंत्रे होते. पुढील तपास चालू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 19/Feb/2025














