चिपळूण : येथील शहर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. चिपळूण नगर परिषदेच्यावतीने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. न.प. कर्मचारी, नागरिक आणि शिवप्रेमींनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९ वाजल्यापासून रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते या शिबिराचा प्रारंभ झाला.
यावेळी माजी नगरसेवक रिहाना बिजले, रश्मी गोखले, सचिन कदम, शशिकांत मोदी, लियाकत शाह, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांवकर, चिपळूण अर्बनचे चेअरमन मोहन मिरगल, कबीर काद्री, बापू साडविलकर, माजी नगरसेवक मनोज शिंदे, सुहास चव्हाण व न.प.चे कर्मचारी उपस्थित होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर रक्तदान शिबिर सुरू झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवरील गाणी व पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच पद्धतीने शहरात संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा व विविध मंडळांतर्फे शिवजयंती विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 20/Feb/2025













