खेड : तालुक्यातील वेरळ गावातील पीर हजरत जलालशहा बाबा दर्गा येथे मंगळवार, दि. १८ रोजी रात्री २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास ऊर्स सुरु असतानाच त्या परिसरात वादविवाद सोडवण्यासाठी गेलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानाला धक्का देऊन धमकावणाऱ्या व शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज निलकंठ ठाकुर (रा. माणगाव, जि. रायगड) आणि शैलेश चव्हाण यांच्यात वेरळ येथे बाचाबाची आणि वादविवाद झाला. यावेळी बंदोबस्त करत असलेल्या महिला पोलीस हवालदार तेथे गेल्या असताना शैलेश चव्हाण याने दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना धक्का मारीत, डाव्या हातावर नखे ओरबाडून जखमी केले. त्यानंतर गृहरक्षक दलाचे जवान प्लाटुन कमांडर सचिन हरिश्चंद्र कडू हे त्याला पोलीस गाडीतून आणत असताना संशयिताने त्यांना अपशब्द वापरत पोलीसांच्या देखतच अंगावर धावत जाऊन शर्ट पकडून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 20/Feb/2025














