रत्नागिरी : जप्तीसारखी कारवाई टाळण्यासाठी रत्नागिरी शहरवासीयांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या नागरिक सुविधा केंद्रात रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी नगरपरिषदेच्या वसुली पथकानेसुद्धा शुक्रवारपासून करवसुली आणि जप्ती कारवाईस प्रारंभ केला आहे. शुक्रवारपर्यंत जप्ती किंवा नळजोडणी तोडण्याची कारवाई झालेली नाही.
रत्नागिरी शहरात सुमारे ३० हजार १६८ मालमत्ता धारक कर १० हजार ३५० नळ जोडण्याधारक आहेत. घरपट्टी आणि पाणीपट्टीतून सुमारे ८ कोटी रुपये कर वसुली करण्याचे उद्दिष्ट आहे. नागरिकांनी आपले थकीत कर भरण्यासाठी महिनाभरापूर्वीपासूनच घंटागाड्यावरील ध्वनीक्षेपकावरून आवाहन केले जात आहे. शहरवासियांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला असून घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेच्या नागरी सुविधा केंद्रात रांगा लागत आहेत. मालमत्ता कर वसुलीसाठी शुक्रवारपासून वसुलीपथकानेही पुढाकार घेतला आहे.
वसुली विभागाचे अधिकारी नरेश आखाडे यांच्या नेतृत्वाखाली वसुलीचे काम सुरु झाले आहे. त्याचबरोबर ज्यांची थकबाकी मोठी आहे, त्याच्यावर कारवाईसुद्धा होणार आहे. यामध्ये मालमत्ता जप्त करणे नळ जोडण्या-कापण्याची कारवाई होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 22/Feb/2025
