खेड : आय. सी. एस. महाविद्यालयात एकदिवसीय राष्ट्रीय परिषद

खेड : येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवार (दि. १) मार्च रोजी एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचा मुख्य विषय कृषी, लोकसंख्या, पर्यावरण, पर्यटन आणि शाश्वत विकासातील समकालीन समस्या’ असा आहे. या परिषदेचे आयोजन आय.सी.एस. महाविद्यालय, खेड व भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद, मुंबई विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

या परिषदेत डॉ. अतुल साळुंखे यांचे बीज भाषण होणार असून, डॉ. हेमंत पेडणेकर, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई व डॉ. प्रकाश डोंगरे आदींचे मार्गदर्शन होणार आहे. या परिषदेसाठी सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेश बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन अॅड. आनंदराव भोसले, संस्था पदाधिकारी, आदी उपस्थित राहणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 24/Feb/2025

Ratnagiri Khabardar add image