रत्नागिरी : दुचाकी चोरी संशयावरून तीन अल्पवयीन ताब्यात

रत्नागिरी : शहराजवळील शिरगाव येथे तीन अल्पवयीन मुलांना दुचाकी चोरीचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणामुळे पोलिस ठाण्यात शिरगाव व कोकणनगर भागातील नागरिकांनी गर्दी केली होती.

दुचाकी चोरीचा प्रयत्न करणारी तीन मुले शहरातील कोकणनगर येथील आहेत. शिरगाव परिसरात दुचाकीशी काहीतरी करत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.

शिरगाव येथील नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी मुलांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले होते. या प्रकरणातील शिरगाव व कोकणनगर येथील नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही ठिकाणच्या नागरिकांनी शहर पोलिस ठाण्यात गदीं केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याबाबत प्रक्रिया सुरू होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 24/Feb/2025