राजापूर : मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही दरवर्षी तीव्र पाणीटंचाईची झळ पोहोचून टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर धावत असलेल्या राजापूर तालुक्याला टंचाईमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यातून, आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीने तालुक्याचा टँकरमुक्त संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. राजापूर तालुक्याचा १ कोटी २ लाख ६० हजार रुपयांचा टंचाईमुक्त संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.
गेल्या दशकभरामध्ये पहिल्यांदा असा आराखडा तयार केला असून, त्यामध्ये संभाव्य टँकरग्रस्त गावांना पाणीटंचाईच्या काळामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याऐवजी विहीर खोदणे, नळपाणीपुरवठा योजना दुरुस्ती, विहीरीत गाळ उपसा वा दुरुस्ती, विंधन विहीर दुरुस्ती आदी विविध स्वरुपाची कामे करून टँकरमुक्त गावे करण्यावर भर देण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी नीलेश जगताप यांनी दिली.
या टंचाई आराखड्यात विविध स्वरुपाच्या ६३ कामांचा समावेश आहे. यामध्ये नळपाणीपुरवठा योजना दुरुस्ती, विहीरीत गाळ उपसा वा दुरुस्ती, विंधन विहीर दुरुस्ती अशा स्वरुपाची कामे असली तरी, १७ गावे, ५० वाड्यांमधील विहीर खोदाईची ४८ कामांचा समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 24/Feb/2025










