रत्नागिरी : तालुक्यातील नांदिवडे गावात अंबुवाडी या ठिकाणी नवसाला पावणारे चव्हाटा देवस्थान आहे. दरवर्षी शेकडो ग्रामस्थ या चव्हाट्याच्या राखणेला नवस लावण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात येतात. सहा वाड्यांची राखण व दशक्रोशीतील लोक मोठ्या भक्तीने राखणेला येतात. सर्व भक्तांना चव्हाटा पावतो. इच्छा पूर्ण करतो, अशी लोकांची श्रद्धा आहे. राखणेच्या नवसाबाबत येथील लोकांची हिच श्रद्धा मोठी असतानाच जयगडनजीकच्या नांदिवडे गावात माथ्यावर महाभयंकर संकट येत आहे. गॅस टर्मिनलसारखा धोकादायक
प्रकल्प जिदल कंपनी समूह या ठिकाणी स्थानिक लोकांना विचारात न घेता आणत आहे. हा प्रकल्प गावातून हद्दपार व्हावा, म्हणून नांदिवडे गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन नवसाला पावणाऱ्या देव चव्हाट्याला गॅस टर्मिनलसारखं महाभयंकर संकट गावातून हद्दपार होऊ दे. गावाचे रक्षण कर. प्रकल्प गावातून स्थलांतर करण्याची बुद्धी अधिकारी व प्रशासनाला दे, असे गाऱ्हाणे ग्रामस्थांनी घातले.
याच नांदिवडे गावात मागील १२ डिसेंबर २०२४ मध्ये वायू गळतीमुळे जयगड माध्यमिक विद्यामंदिर आणि नांदिवडे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे आजही संपूर्ण नांदिवडेतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच कारणाने ग्रामस्थानी नवसाला पावणाऱ्या देव चव्हाट्यालाच गा-हाणे घालून गॅस प्रकल्प हद्दपार होऊ दे, अशी प्रार्थना केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 25/Feb/2025














