रत्नागिरी : तालुक्यातील कोळंबे येथे कावीळ झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना रविवार २३ फेब्रुवारी राजी दुपारी १ वा. सुमारास घडली. हरिश्चंद्र महादेव भितळे (५४, रा. कोळंबे वाकीवाडी, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. हरिश्चंद्र भितळे हे गेल्या एक महिन्यापासून कावीळ या आजाराने ग्रस्त होते. रविवार दुपारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रथम कोळंबे फाटा येथील खासगी डॉक्टकडे नेऊन अधिक उपचारांसाठी जिल्हा शाकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी उपचारांदरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भितळे यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 25/Feb/2025














