रत्नागिरी : तालुक्यातील टेभ्येपूल येथील काजळी नदीपात्रात मृतावस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कल्पेश किरण शिंदे (३४, रा. टेंभ्ये, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २४) सकाळी साडे अकराच्या सुमारास काजळी नदीपात्रात निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल (ता. २३) रात्री घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी ग्रामस्थांना कल्पेश शिंदे यांचा मृतदेह टेभ्येपुल येथील काजळी नदीपात्रात दिसून आला. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. खबर मिळाताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:27 PM 25/Feb/2025














