रत्नागिरी : साळवीस्टॉप येथील धुराचा प्रश्न ऐरणीवर

रत्नागिरी : शहरातील साळवीस्टॉप येथील डंपिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. येथे टाकण्यात येणारा कचरा वारंवार पेटवला जात आहे. त्यामुळे या भागात धुरामुळे लहान मुले, वयोवृद्धांना दम्याचा त्रास होऊ लागला आहे. याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करून हा परिसर प्रदूषणमुक्त करावा, अन्यथा मोठे आंदोलन छेडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने पालिकेला दिला.

शहरातील साळवीस्टॉप येथे गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृतपणे कचरा जाळला जात आहे. त्याचा लगत राहणाऱ्या कोकणनगर, स्टेट बैंक कॉलनी, क्रांतिनगर, साळवीस्टॉप, शिवाजीनगर, चर्मालय आदी भागातील नागरिकांना व मुलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. ही माच खूपच गंभीर असतानाही रत्नागिरी पालिका मात्र त्याकडे गांभीर्याने पाहत नाही.

दरदिवशी शहरातील सुमारे २० ते २२ टन घनकचरा साळवीस्टॉप येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये जातो. या कचऱ्यावर प्रक्रिया करून काही प्रमाणात खतनिर्मिती केली जाते; परंतु त्यातून कचरा संपत नसल्याने त्याचा साठा वाढतच चालला आहे. परिणामी, अनेकवेळा हा कचरा बेकायदेशीरपणे जाळला जातो. यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरतो, मोठा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. याबाबत वारंवार आंदोलने करून, निवेदने देऊनही काही परिणाम झालेला नाही; परंतु प्रकल्पासाठी जगा नसल्याने पालिकेमुळे कोणताही पर्याय उरलेला नाही. साळवी स्टॉप परिसर धूरमुक्त करावा अन्यथा आंदोलन छेडू, असा इशाराही राष्ट्रवादीने दिल्या. या वेळी जखेर राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा, युवानेते सईद पावसकर, सनीफ गवाणकर आदी उपस्थित होते.

आम्ही जागेसाठी प्रयलशीत आहोत. एमआयडीसीकडून घनकचरा प्रकल्पासाठी जागा दिली जाणार आहे. जागा मिळाल्यानंतर तत्काळ कचरा प्रकल्प सुरू केला जाईल. तोवर कचऱ्याला आग लागू नये यासाठी त्यावर पाणी मारण्याची, खतनिर्मितीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. – तुषार बाबर, मुख्याधिकारी, रत्नागिरी पालिका

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटिसा
वारंवार होणाऱ्या धुराबाबत तक्रारी झाल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला नोटीस बजावून कचऱ्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत; परंतु पालिकेकडून गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये कोणत्याही उपयायोजना न केल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेवर आठ लाखांच्या दंडाची कारवाई केली आहे. तो दंड देखील पालिकेने भरलेला नाही. तसे चरिष्ठ कार्यालयाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कळवले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 26/Feb/2025