रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या ताफ्यात ९४९ वाहने

रत्नागिरी : गेल्या पाच वर्षांमध्ये जिल्हा पोलिसदलाला जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गरजेची वाहने मिळाली आहेत. त्यामुळे पोलिसदलाच्या ताफ्यात ९४९ वाहने झाली असून, दल मजबूत झाले आहे. वाहनांकडून पोलिसदलाची गरज भागली नसली, तरी आता पुरेशी वाहने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही काही घटना घडली, तर जलद गतीने पोलिस घटनास्थळावर पोहोचत एवढे गतिमान पोलिसदल झाले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

अत्याधुनिकतेची कास धरलेल्या या पोलिस दलाला जिल्ह्यात विविध घटना घडल्या धनंजय कुलकर्णी की, तत्काळ घटनास्थळावर पोहोचणे आवश्यक असते. त्यासाठी वाहनांची गरज असते. अनेकवेळा वाहनांच्या कमतरतेमुळे वेळेत घटनास्थळी पोहोचता येत नाही. त्यामुळे वाहनांची मागणी करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून जिल्हा नियोजनमधून सुमारे १४० वाहने पोलिसदलाला दिली आहेत. त्यामुळे पोलिसदलाला गस्त, तातडीची गरज, अधिकारी, कर्मचाऱ्यांना अपेक्षित वाहने, शीघ्र कृतिदल, मोठी वाहने उपलब्ध झाली आहेत.

पोलिसदलाची सुमारे ८०९ आणि जिल्हा नियोजनची मिळून ९४९ वाहने पोलिसदलाच्या ताफ्यात आहेत. दुचाकी, थार, योद्धा, दोन दंगा नियंत्रण पथक ३५ कर्मचाऱ्यांसाठी २ मोठ्या बस, बोलेरो, ई-बाईक आदी वाहने मिळाली आहेत. त्यामळे सुलभता येणार असून, गुन्हेगारांचा पाठलाग करण्यासाठी वाहनांची मदत होणार असून दलाची गती वाढली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 26/Feb/2025