आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

सावर्डे : आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता. १ मार्च) सावर्डेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार निकम दिवसभर सावर्डेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपर्क कार्यालयात जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. यानिमित्त सकाळी ११ वाजता पक्षाच्या सभासद नोंदणीचा प्रारंभ होणार आहे. सकाळी त्यांच्या निवासस्थानी औक्षण झाल्यानंतर आमदार निकम त्यांचे वडील स्व. गोविंदराव निकम यांच्या समाधिस्थळाला भेट देऊन सहपरिवार दर्शन घेतील. त्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास महामार्गावरील पक्षाच्या संपर्क कार्यालयात जनतेच्या शुभेच्छा स्वीकारतील. या ठिकाणी निकम यांचे सह्याद्री परिवाराच्या वतीने अभीष्टचिंतन करण्यात येणार आहे.

वाढदिवसानिमित्त सावर्डे बाजारपेठेत निकम यांना शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले आहेत. तसेच संपर्क कार्यालयासमोर मंडप उभारण्यात आला आहे. सलग दुसऱ्यांदा निकम आमदार झाल्यानंतर त्यांचा या कारकिर्दीतील पहिलाच वाढदिवस आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 01/Mar/2025

Aayurzil