राजापुरात १६ मार्च रोजी पालखी महोत्सव

राजापूर : राजापूर प्रतिष्ठान राजापूरच्यावतीने रविवार दि. १६ मार्च २०२५ रोजी पालखी महोत्सव २०२५ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यशोदीन सृष्टी पाटील मळा, गुजराळी, राजापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील लोकप्रिय असलेली होळी, पालखी सोहळा, खेळे, नमन, गोमू, शंकासुर अशा विविध रंगात विविध ढंगात साजरा होणारा शिमगोत्सव कोकणचे जणू सांस्कृतिक संचित. शिमगा कोकणातील मोठा सण नाहीतर उत्सव आहे. या सणाला कित्येक पिढ्यांची परंपरा आहे.

परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात आहारी गेलेल्या नव्या पिढीला आपल्या सण, रुढी, परंपरा यांचा विसर पडू लागला आहे. अशावेळी निखळ आनंद मिळवून देणाऱ्या आपल्या परंपरागत संस्कृतीची ओळख व त्याची जाण नव्या पिढीला व्हावी, तसेच काळाच्या प्रवाहात कालबाह्य होऊ पाहणारे कोकणातील पारंपारिक सणांचे व कलेचे जतन व्हावे या उद्देशाने राजापूर प्रतिष्ठानच्यावतीने पालखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ग्रामदेवतांच्या पालख्या देवदेवतांसह आपल्या ढोल, खेळ्यांसह सहभागी होऊन पारंपरिक नृत्य सादर करतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 01/Mar/2025

Khabardar diwali fest