रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील बाकड्यावर झोपलेल्या परप्रांतीय वृध्दाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.१५ वा. सुमारास घडली. रमेश राम मडीवाल (५८, मूळ रा. चारभूजा माउंट अबू जि. शिरोही, राजस्थान) असे मृत्यू झालेल्या परप्रांतिय वृध्दाचे नाव आहे.
गुरुवारी सकाळी रेल्वे पोलिस कर्मचारी हे प्लॅटफॉर्म क्रं १ वर गस्त करत असताना त्यांना तेथील बाकड्यावर रमेश मडीवाल हे झोपलेल्या आणि त्यांच्या तोंडातून फेस येत असलेल्या अवस्थेत दिसून आले. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 01/Mar/2025














