कशेडी बोगद्याजवळ दोन कारचा अपघात; ५ जण जखमी

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्या पासून सुमारे १ किमी अंतरावर आय टेन कारला व वेंग्नार कारने धडक देऊन झालेल्या अपघातात आय टेन कार मधील ५ प्रवाशी जखमी झाल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ३० वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी वेंग्नार कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत प्रभाकर पवार, रा. वेरळ, ता खेड असे गुन्हा दाखल झालेल्या वॅग्नार कार चालकाचे नाव आहे तर या प्रकरणी संतोष आनंद घाडगे, वय ५७, रा. अन्नपुर्णानगर आधारवाडी चौक कल्याण पश्चिम ठाणे यांनी तक्रार दाखल केली असून या कार अपघातात संतोष आनंद घाडगे, नीलम संतोष घाडगे, दोन्ही रा. वय ५७, रा. अन्नपुर्णानगर आधारवाडी चौक कल्याण पश्चिम ठाणे, राजेश हिरालाल गोहील, जयश्री अरविंद बारीया रोशन अरविंद बारीया फिर्यादी यांच्या ताब्यात असलेली ग्रैंड आय टेन स्पार्ट्स वाहन क्र एम. एच ०५ सी. एम ४६५८ हि चालवित खेड येथील कशेडी बोगदा पास करून पुढे १ कि. मी अंतरावर आले असता समोरून मारुती वेंग्नार एम. एच ०५ एफ.पी ७५९४ ही वेगात येऊन जोरदार धडक दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:31 PM 01/Mar/2025