◼️ पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी केले विविध स्पर्धाचे आयोजन
रत्नागिरी : श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय खेडशी तालुका जिल्हा रत्नागिरी येथे 28 फेब्रुवारी विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
खेडशी पंचक्रोशी परिसरातील विविध मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा, विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन आणि इंग्रजी विषयातील टीएलएम साहित्याचे प्रदर्शन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये पंचक्रोशी मधील विविध शाळांमधील चित्रकला स्पर्धेमध्ये सुमारे 125 विद्यार्थी, हस्ताक्षर स्पर्धेमध्ये 50 विद्यार्थी, प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहा शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
खेडशी हायस्कुल मधील विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रतिकृती चे प्रदर्शन भरवले होते. तसेच इंग्रजी विषयाच्या अध्यापन साहित्याचेही प्रदर्शन भरवण्यात आले होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धाना सामोरे जाता यावे या उद्देशाने या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील विज्ञान शिक्षिका सौ.अनन्या कदम यांच्या नियोजनातून आणि मुख्याध्यापक श्री.सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धा पार पडल्या.
सदर स्पर्धेसाठी विद्यालयातील शिक्षिका सौ.कळंगुटकर, सौ. दरेकर, सौ. सावंत, श्रीम पवार, सौ. दिवेकर, सौ. साळुंखे, सौ. होरंबे, सौ. शेवडे, श्रीम. कर्लेकर यांनी सहकार्य केले. इतर शाळांमधून आलेले विद्यार्थी तसेच पालक आणि शिक्षकांनी शाळेने घेतलेल्या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत खेडशी हायस्कूलने असेच शैक्षणिक आणि मुलांच्या विचारांना वाव देणारे उपक्रम राबवावेत अशी आशा व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 03-03-2025














