संगमेश्वर : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर स्थानिक वाहतूकधारकांना त्रास दिला जात असून, परप्रांतीय वाहतूकधारकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. आधीच इंधन दरवाढीमुळे वाहतूक व्यवसाय करणे अवघड झालेले असतानाच स्थानिक वाहतूकदारांना शासकीय यंत्रणांचा त्रास होत आहे. साखरपा ते आंबा घाट दरम्यान वाहनचालकांवर कारवाई केली जात असल्याचे शिवसेनेचे माजी सभापती जयसिंग माने यांनी सांगितले.
वाहनचालकांच्या समस्या सोडवा; अन्यथा आंदोलन करू असा इशारा माजी सभापती माने यांनी दिला आहे. आंबा घाट परिसरात प्रामुख्याने ट्रक, डंपर, ट्रॅव्हल्स, रिक्षा व्यावसायिक यांना थांबविण्यात येते. मात्र, याच ठिकाणाहून बेकायदेशीर चिरा, वाळू, यासह अन्य साहित्यांची ओव्हरलोड वाहतुकीकडे यंत्रणांचे दुर्लक्ष होते. त्यावर कारवाई न करता, त्यांना सोडून दिले जाते. मात्र, सर्वसामान्य वाहतूकदाराना दंड केला जोता. या परिस्थितीमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हे प्रकार थांबले नाहीत, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा माने यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 03/Mar/2025














