धम्म संघटनेच्यावतीने गुहागर तहसीलदारांना निवेदन

गुहागर : बिहार येथील “बोधगया महाबोधी महाविहार” मुक्तीसाठी बौद्ध भिक्षुनी शांततामय मार्गाने चालू केलेल्या आंदोलनास बिहार पोलिसांनी अमानुषपणे ओढत नेऊन अपमानीत केले त्यास जबाबदार असणाऱ्या बिहार पोलिसांचा आणि बिहार सरकारचा बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने जाहिर निषेध करून “बोधगया महाबोधी महाविहार” ब्राम्हणी भिक्षुच्या ताब्यातून बौद्ध भिक्षुच्या बोद्ध जनतेच्या ताब्यात द्यावे, असे जाहिर निवेदन गुहागरचे तहसीलदार परिक्षित पाटील यांना बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रति राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्म, पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहार, पटनाचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, राज्यपाल महाराष्ट्र राज्य सी. पी.राधाकृष्णन यांना पठिविण्यात आल्या आहेत.

बोधगया, बिहार (भारत) येथील जगातील बौद्धांचे धार्मिक श्रद्धास्थान असलेले “बोधगया महाबोधी महाविहार हे जगातील प्रमुख अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ असून जगाच्या कानाकोपऱ्यातील बौद्ध धर्मिय लोक येथे श्रद्धेने नतमस्तक होण्यासाठी येत असतात तसेच इतर सांप्रदायी लोक, पर्यटकही येथे भेट देण्यासाठी येत असतात” बोधगया महाबोधी महाविहार” हे बौध्दांचा वारसा असलेले महाविहार आहे. त्याच्यावर ब्राम्हणांचा कब्जा आहे तेव्हा तात्कालिन बिहार सरकारने बोधगया मंदिर कायदा १९४९ (BTMC ACT 1949) मध्ये तशी व्यवस्था करुन ठेवलेली आहे. “वारसा बौद्धांचा त्यावर सत्ता मात्र ब्राम्हणांची”, हिंदूची हा अजब न्याय बिहार सरकारने करुन ठेवले आहे. भारत हि बुद्ध भूमी आहे. अशी जागतिक स्तरावर भारताची विशेष ओळख आहे. परदेशी दौरा करताना भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राजकीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना परदेशी दौरे करणारे अभिमानाने सांगतात की, मी बुद्ध भूमीमधून आलो आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 05/Mar/2025