रत्नागिरीत आज ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ दशपूर्ती सोहळा रॅली’

रत्नागिरी : ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ या भारत सरकार च्या उपक्रमाला दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी दहा वर्षे पूर्ण झाली असल्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस दल व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०६/०३/२०२५ रोजी सायंकाळी ०४.३० ते ०६.०० या वेळेत पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व महिला व मुलींसाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ दशपूर्ती सोहळा व रॅली’ चे आयोजन करण्यात आलेले आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र संजय दराडे (भा.पो.से.), यांच्या शुभ हस्ते या दशपूर्ती रॅलीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात येणार आहे. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक, धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती. जयश्री गायकवाड, पोलीस अधिकारी व अंमलदार, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय रत्नागिरी येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित असणार आहेत.

या (दुचाकी) रॅली करिता खालील प्रमाणे मार्ग (Route)असणार आहे.
प्रारंभ: पोलीस मुख्यालय कवायत मैदान -> जेल नाका -> माळ नाका – > जेल नाका -> भाटये बीच -> जयस्तंभ -> रहाट घर -> नाईक फॅक्टरी -> पेठ किल्ला व परत -> पोलीस कवायत मैदान येथे शेवट होणार आहे.
तरी, याद्वारे आवाहन करण्यात येते की, रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी व मुलींनी या दशपूर्ती रॅली मध्ये सहभाग घ्यावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 06-03-2025

Tata tiago