रत्नागिरीत रविवारी सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ‘स्वर वंदना’

रत्नागिरी : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक गायनाचार्य कै. राजाराम बुवा नारायण पराडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मदिनानिमित्त ‘स्वर वंदना’ हा नाट्यगीत गायनाचा कार्यक्रम रविवारी, दि. ९ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी ५ वाजता जयेश मंगल पार्क येथे होणार आहे, अशी माहिती संचालक बिभिषण चवरे यांनी दिली. या मैफलीमध्ये सूरमणि पं. श्रीपाद पराडकर, दीपा पराडकर साठे, पं. ललित पराडकर आणि मुग्धा भट-सामंत यांचे शास्त्रीय, उपशास्त्रीय,अभंग, नाट्यगीत गायन होणार आहे. त्यांना या मैफलीमधे हार्मोनियमसाथ चैतन्य पटवर्धन, तबलासाथ हेरंब जोगळेकर, पखवाज साथ मंगेश चव्हाण, तालवाद्यसाथ अद्वैत मोरे करणार आहेत. या कार्यक्रमाचे लेखन प्रदीप तेंडुलकर यांनी केले आहे. सौ. दीप्ती कानविंदे कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 06-03-2025

Shanti real estate 1