रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात निःशुल्क योग शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे पुन्हा एकदा निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर दि. १० ते २५ मार्च या दरम्यान अरिहंत मॉल येथील तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात होणार आहे. दररोज सायंकाळी ५.३० वाजता हे शिबिर होणार असून याचा जास्तीत जास्त फायदा नोकरदार वर्गाला होऊ शकतो. रत्नागिरी शहरातील विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी यांनी आरोग्य सुदृढ करणाऱ्या निःशुल्क योग शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी योग प्रशिक्षक प्रा. अक्षय माळी (७७९८४९०६१५) यांच्याशी संपर्क साधावा शिवाय https://forms.gle/p9dMnN9BReru49jQ9 या लिंकवरून आपला गुगल फॉर्म भरून नोंदणी करावी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:35 06-03-2025