काजरघाटी येथील श्री महालक्ष्मीच्या शिमगोत्सवाला ९ मार्चपासून सुरुवात

पावस : रत्नागिरी शहराजवळील पोमेंडी खुर्द (काजरघाटी) येथील श्री महालक्ष्मी देवस्थानतर्फे ९ मार्चपासून शिमगोत्सव साजरा करण्यात येणार आहे. रविवारी देवींना रूपे लावल्यानंतर उत्सवाला सुरुवात होणार असून २८ मार्चला उत्सवाची सांगता होणार आहे.

महालक्ष्मी देवीची पालखी १० मार्चला होळी तोडण्यासाठी सकाळी ९ वाजता बाहेर पडणार आहे. यावर्षी रत्नागिरीतील चवंडेवठार येथील प्रकाश मयेकर यांच्याकडे होळी तोडण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता होळी घेऊन पालखी ढोलताशांच्या गजरात काजरघाटीकडे प्रस्थान करणार आहे.

रात्री १२ वाजता गावातील भगवान कल्ये यांच्याकडे पालखी होळीसह स्थान्नापन होईल. ११ ला पालखी होळीसह दुपारी १ वाजता मिरवणुकीने मंदिरापर्यंत नेली जाणार असून, सायंकाळी ४ वाजता होळी उभी केली जाईल. त्यानंतर १५ मार्चपर्यंत पालखी मंदिरामध्ये स्थानापन्न राहणार आहे. १५ मार्चला दुपारी १२ वाजता पालखी ढोल-ताशांच्या गजरात गावभेटीसाठी बाहेर पडेल. सर्वप्रथम ती रामेश्वरवाडी येथे जाणार असून, त्यानंतर काजरघाटी, साईनगर, कुवारबाव येथील घरी पूजा घेण्यासाठी जाईल. घरभेटीच्या कार्यक्रमानंतर २७ मार्चला पालखी रात्री ९ वाजता मंदिरात येईल. या ठिकाणी रात्री १० वाजता ढोलवादन स्पर्धा होणार आहे. २८ मार्चला देवीची रूप उतरवल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.

चाकरमानी कोकणात
काजरघारीचा महालक्ष्मीचा मंगळवारी शिमगोत्सव होणार आहे. उत्सवासाठी चाकरमान्यांची पावले कोकणाकडे वळू लागली आहे. अनेक चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत.

Hotel waiter

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 07/Mar/2025