रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव येथे महाराष्ट्र नेवल युनिटसाठी एनसीसी भवन उभारण्या करीता ४२ कोटी ४३ लाख ६१ हजार इतक्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती. यापैकी पाच कोटीचा निधी वितरित करण्यासाठी नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने या निधीला आता मान्यता मिळाली आहे.
रत्नागिरीत महाराष्ट्र नेवल युनिटचे एनसीसी भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या भवनासाठी २०२२-२३ च्या दर सूची प्रमाणे ४२ कोटी ४३ लाख ६१ हजार इतक्य खर्चाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली होती. त्या अनुषंगाने क्रीडा व युवक सेवा आयुक्त यांनी या भावनाच्या बांधकामासाठी निधीची मागणी केली होती. या पत्राच्या अनुषंगाने या भावनाच्या बांधकामासाठी पाच कोटी इतका निधीची तरतूद करण्याची बाब शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या विचाराधीन होती. त्यानुसार या भवनाच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात पाच कोटी इतका निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 07-03-2025














