नवी दिल्ली – जर पाकिस्तानने विकासाच्या बाबतीत भारताला मागे सोडलं नाही तर माझं नाव बदलेन असा दावा पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला आहे. देशातील जनतेला खुश करण्यासाठी कदाचित शहबाज यांनी हे विधान केले असावे परंतु वास्तव पाहिले तर हे चित्र फार दूर आहे.
भारताला मागे टाकण्याचा चंग बांधणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधानांनी आधी त्यांच्या देशातील स्थितीवर लक्ष द्यायला हवं असा शहबाज शरीफ यांचं विधान ऐकून प्रत्येकजण बोलत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्या विकासात काय फरक?
पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश एकमेकांचे शेजारी आहेत परंतु त्यांच्या अर्थव्यवस्था आणि विकासात मोठी तफावत असल्याचं दिसून येते. २०२४ ची पाकिस्तानी जीडीपी सांगायचं झाल्यास १.६५९ ट्रिलियन डॉलर आहे. या वर्षी २०२५ मध्ये ती १.७३६ ट्रिलियनपर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये वर्ल्ड इकोनॉमी आऊटलूकमध्ये हे आकडे दिलेत. दुसरीकडे भारताचा जीडीपी २०२४ मध्ये १४.५९४ ट्रिलियन डॉलर आहे. २०२५ मध्ये जीडीपी दर १५.५४१ ट्रिलियनपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जर सामान्य जीडीपी पाहिला तर भारत ४.१३६ ट्रिलियन अमेरिकन डॉलर तर पाकिस्तान ०.३४१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका आहे. भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या १२ पट अधिक आहे.
पाकिस्तानात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. २०२३ मध्ये पाकिस्तानात बेरोजगारी दर २२ टक्के होता. २०२०-२१ मध्ये हा दर ६.३ टक्के होता. १५ ते २४ वर्षातील युवकांची बेरोजगारी २९ टक्के इतकी आहे. १६ मिलियनपेक्षा अधिक युवक ना नोकरी करतात ना कुठलेही शिक्षण घेत आहेत अशा युवकांची संख्या येणाऱ्या काळात २२ मिलियनपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. महिलांची स्थिती आणखी बिकट आहे. याठिकाणी महिलांच्या बेरोजगारीचा दर ३९ टक्के आहे. ज्या महिला काम शोधतात त्यांना नोकरी मिळणे कठीण आहे.
दरम्यान, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारतात ५८६ मिलियन लोक काम करतात. याठिकाणी जगातील सर्वात मोठी कामगार शक्ती आहे. भारताने बराच विकास साधला आहे. परंतु याठिकाणी समस्या आहेत. भारतात श्रीमंत आणि गरीब यांच्यात दरी आहे. इथं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहतात पण गरीबीची तितकीच आहे. परंतु भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पाकिस्तानची अवस्था सध्या खूप बिकट आहे. बेरोजगारी आणि शिक्षण याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे भारताला मागे टाकणं पाकिस्तानसाठी एखाद्या स्वप्नासारखं आहे.
अधिक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:38 08-03-2025