मंडणगडमध्ये कापडी पिशव्यांचे वाटप

मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आजिवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने मंडणगड बाजारामध्ये नुकतेच कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहल जाधव, विस्तार विभाग समन्वयक प्रा. संदीप निर्वाण, प्रा. शरिफ काझी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला समन्वयक प्रा. संदीप निर्वाण यांनी उपस्थित नागरिकांचे स्वागत केले तर प्रा. शरिफ काझी यांनी कार्यक्रमामागील उद्देश सांगताना प्लॅस्टिक प्रदूषणाचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम याबाबत थोडक्यात माहिती सांगितली.

यावेळी प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनीही मार्गदर्शन केले. एस. टी. स्टॅण्ड परिसरात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे उपस्थित ग्रामस्थांना वाटप करण्यात आले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. शरिफ काझी यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 10/Mar/2025