चिपळूण : दसपटीतील खेळाडूंसाठी अलोरे क्रीडा मैदानात उभारलेल्या सुसज्ज पेव्हेलियनचे उद्घाटन आ. शेखर निकम यांच्या हस्ते नुकतेच झाले. आ. निकम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत हा सोहळा झाला.
कोयना सिंचन विभाग, कोयना नगर या विभागामार्फत आलोरे पंचक्रोशीतील खेळाडूंना अलोरे मैदानात चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प आ. निकम यांनी केला होता. त्याचाच एक भाग म्हणून पॅव्हेलियनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पॅव्हेलियनचे उद्घाटन आ. निकम यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी चिपळूण-संगमेश्वर विधानसभेचे क्षेत्र अध्यक्ष रमेश राणे, पंचायत समितीचे माजी सदस्य बाबू साळवी, शिरगाव सोसायटीचे चेअरमन जयंत शिंदे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष रणजित पाटील, दत्ताराम बंगाल, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा उपाध्यक्ष, चिपळूण तालुका युवक अध्यक्ष नीलेश कदम व कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 10/Mar/2025














