रत्नागिरी : केळ्ये, मजगाव, महामूरवाडीचे ग्रामदैवत श्री नवलाई, पावणाई, वाघजाई, कालकाईचा शिमगोत्सव १२ ते २५ मार्च या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री नवलाई पावणाई, वाघजाई, कालकाई विश्वस्त समितीने केले आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रथम वर्धापदिन सोहळासुद्धा दिमाखात पार पडला आहे. १२ मार्चला दुपारी ३ वाजता देवळात पालखी देवीचे रूपे धारणे करून बसणी येथे सायंकाळी ५ वाजता रवाना होईल. बसणी येथून परत येताना महामूरवाडी मानावर येईल व नंतर मार्गस्थ होईल.
१३ रोजी रात्री होळी पौर्णिमेला होळी उभी राहील. १४ ला खोतांच्या घरी नैवेद्य, ३ ते ५ वाजता ३ पालख्यांची भेट होईल. १५ रोजी पालखी लिंगायत समाज बैठी राहील. १६ ला पड्यारवाडी, १७ ला सोलकरवाडी, १८ ला डोंगरेवाडी, १९ ला मजगाव, शितपवाडी, चव्हाटा, २० रोजी महामूरवाडी, २१ रोजी लिंगायत समाज, रात्री १२ वाड्यांचे नमन होणार आहे. २२ रोजी ठीकवाडी, २३ ला पवारवाडी, नेनेवाडी व गोखले यांच्याकडे मुक्काम, २४ ला आंबेकोंड (रात्री बापट यांच्याकडे बैठी) येथे नेण्यात येणार आहे. २५ मार्चला पाळंदवाडी व सायंकाळी श्री देवीचे रूपे उतरण्याचा कार्यक्रम होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 10/Mar/2025














