संगमेश्वर : कुंभारखाणी बुद्रुकमध्ये १३ मार्चपासून शिमगोत्सव

सावर्डे : संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथील ग्रामदेवता मंदिर क्र. दोन श्री गंगा, वरदान, वाघजाई, भावकादेवी व बाजी केदार या देवस्थानतर्फे १३ मार्चपासून परंपरेप्रमाणे शिमगोत्सवास सुरुवात होणार आहे.

गुरुवारी दुपारी तीन वाजता ग्रामस्थ व देवीभक्तांच्या उपस्थितीत देवीची चंदेरी रूपे मानकरी, गावकरी, गुरव यांच्या समवेत पालखीत लावतील.

सायंकाळी सहा वाजता माड तोडण्यात येईल. १४ ला दपारी तीन वाजता ग्रामस्थांची सभा होऊन त्यामध्ये मान्यवरांचे सत्कार होतील. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास माड उभा करून होळी, धुलिवंदन संपन्न होईल. दिवसभर महिलांना मंदिरात पालखीत तसेच सहाणेवर देवींची ओटी भरता येईल. सायंकाळी पालखी ढोल-ताशांच्या गजरात गावभेटीसाठी कोंडराई धडा क्र. पाचमधील घरांना पूजा घेण्यासाठी देवीची पालखी भोवनी भेट देईल. या दिवशी उपस्थित सर्व देवीभक्तांसाठी अन्नप्रसाद दिला जातो. ही पालखी १६ मार्च सायंकाळपर्यंत तिथे असेल. त्या सायंकाळी पालखी राईकोंडमधील धडा क्र. सातमधील घरांना पूजा घेण्यासाठी जाईल, मंगळवार अठरा मार्चपर्यंत पालखी तिथे घराघरामधून पूजा घेईल. १८ ते २१ मार्चपर्यंत पालखी मधलीवाडीतील घरांना पूजा घेण्यासाठी भेट देईल.

ज्या ठिकाणी पालखी रात्रीच्या वस्तीला असते त्या ठिकाणी आलेले सर्व देवीभक्त, पालखी नाचवणारे नर्तक यांच्यासाठी अन्नप्रसादाची सेवा उपलब्ध असते. घरभेटीच्या कार्यक्रमानंतर २१ मार्चला सायंकाळी पालखी मंदिरात येईल. सहा ते रात्री दहा या कालावधीत पालखी देवीचा गोंधळ होऊन देवीची रूपे उतरण्यात येईल व शिमगोत्सवाची सांगता होईल.

Swami swaru. Pat.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 10/Mar/2025