मंडणगड : गोकुळगाव ग्रामस्थ सेवा मंडळाच्यावतीने शिमगोत्सवानिमीत्त विविध उपक्रम राबविण्यास सुरूवात झाली आहे. ग्रामदेवतेच्या पालखी सोबत असलेला खालुबाजा, सोंग, नाच-गाणे व अनेक रिवाज गोकुळगावच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. तसेच खेळ्यांचा आकर्षक पेहराव लक्ष वेधून घेणारा ठरतो.
शिमगोत्सवात गावोगावच्या पालख्या सिमोल्लंघन करून दर्शनासाठी बाहेर पडतात. नवसाला पावणारी अशी ओळख असलेल्या गोकुळगाव ग्रामदेवतेच्या पालखीमध्ये अज्ञाथ, सोमया, मारती, खेतुरपाल, काळबादेवी स्थानापन्न असते. पालखी तालुक्यात दोन दिवस फिरली असून गणेशकोंड शिपोळे, हरिहरेश्वर येथे दोन देवाची भेट झाली. वेसवी, किल्ला, बल्दा, केगवळ, कातळकोंड, कान्टा, गुडेघर, देव्हारे, केळशी फाटा अशा पाच दिवसांच्या फेरीनंतर पालखीचे गावात आगमन होणार आहे. शिमगोत्सव पांरपारीक सण आहे. पुर्वीपासून आलेल्या प्रथा पंरपरांचे पालन आजची नवीन पिढी काळानुरुप आवश्यक ते बदल करुन चालवित आहे. त्यामुळे गोकूळगावच्या पालखीसोबत खालुबाजा, सोग, नाच गाणे व अनेक रिवाज हे कायम आहे. त्यासोबत पाच दिवसांचा कार्यक्रमही केला जातो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 10/Mar/2025














